उस्मानाबाद ! महिलेवर अत्याचार; सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी


उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, एका पुरुषाने गावातीच एका ३३ वर्षीय महिलेशी जवळीक साधून ऑगस्ट- २०२० ते मे-२०२२ या कालावधीत तीच्याशी वेळोवेळी लैंगीक संबंध ठेवले. यातून त्यांना एक अपत्य होवून कालांतराने त्या महिलेने लैंगीक संबंध ठेवण्यास त्यास नकार दिला असता त्याने स्वत: च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच आपल्याकडील तीचे खाजगी फोटो समाजात प्रसारीत करण्याची त्या महिलेला धमकी दिली. 

यासोबतच त्यां दोघांना झालेल्या अपत्याचा ताबा तो तीला मागत असून ते अपत्य ताब्यात न दिल्यास त्या महिलेस ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं.कलम ३७६,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments