एकनाथ शिंदे यांचे बंड प्रकरण आता धक्कादायक वळणावर पोहचले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटीत झालेल्या बंडखोऱांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसह गेलेल्या ५० आमदारांनी ही एकमुखाने ही मागणी केल्याचे समजते. मात्र, आता बंडोखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. यामुळे या संपूर्ण गटाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.
एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता मिळेल की नाही याबाबत शंका आहे. यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही. हा सगळा गोंधळ असताना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी बंडखोरांकडून करण्यात आली आहे.
नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ न मिळाल्याने कोर्टात जाणार
आमदारांच्या अपात्र करण्याच्या नोटिसा उपाध्यक्षांकडून मिळालेल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी उत्तर कसे देणार, हा प्रश्न बंडखोर आमदारांपुढे आहे. उत्तर सोमवारपर्यंत दिले नाही तर अपात्र होण्याचा धोका आहे. त्यामुळे याविरोधात हायकोर्टात जाण्याचे ठरवण्यात आले आहे.
आता भाजपा काय प्रतिसाद देणार
या बंडामागे भाजपा पडद्याआड असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी बंडखोरांनी केली तर भाजपाची काय भूमिका असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
१) विधानसभा उपाध्यक्ष यांनी सदस्यांना अपात्र करण्याबाबतच्या नोटीस सदस्यांना पोचलय
२) दोन दिवसांत नोटीस ला उत्तर देण्याचा नोटीस मध्ये उल्लेख
३) शनिवारी आणि रविवारी उत्तर कसं देणार हा सदस्यांसमोर पेच
४) उत्तर न दिल्यामुळे अपात्र करण्याचा धोका वाढला
५) परिणामी सदस्यांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात धाव
६) आज सर्व आमदारांनी वकील पत्रावर साह्य केल्या
७) उद्या अपत्रतेच्या नोटीसीवर आमदार स्टे घेणार
८) आठवडा नवीन सरकार स्थापन होणार
९) आतापर्यंत तरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा
१०) ५० आमदारांचा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याचा आग्रह
0 Comments