वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील वैराग येथे जुन्या भांडणाच्या रागातून चौघा जणांना तलवार, लोखंडी गंज, व लाकडाने मारहाण केले आहे. यामध्ये प्रदीप मारुती जिरगे (वय ३५), अनील प्रभू जिरगे (वय ५४), शुभम अनिल जिरगे (वय २९) व मारुती प्रभू जिरगे (वय ६७) रा. सर्वजण वैराग ता. बार्शी हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. १२ जून रोजी संध्याकाळी साडे आठ च्या सुमारास ही घटना घडली आहे. किशोर नंदकुमार सावंत व बन्नू सर्जेराव सावंत यांच्यासह ८ ते १० जणांनी आमच्याकडे रागाने का बघतो म्हणत तलवार, लोखंडी गंज, लाकूड यांनी मारहाण केली आहे. यामध्ये हे चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तेथील डॉक्टरच्या रेफरन्स सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीमध्ये करण्यात आली आहे.
0 Comments