सोलापूर - १ हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५०० रुपये स्वीकारले असताना कृषी विस्तार अधिकारी संदिप रामदास गावडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रंगेहात पकडले.
यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांचे नावे जिल्हा परीषद सेस अंतर्गत डी बी टी योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशिन अनुदान मिळणेकरीता कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग येथे अर्ज सादर केला असुन सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करीत असताना आलोसे संदिप रामदास गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग यांनी सदर अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगुन सदर अकाउंट नंबर दुरुस्त करण्याकरीता १ हजार रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती ५०० रुपये स्विकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग, कार्यालयात स्वतः स्विकारलेवरुन त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
0 Comments