बार्शी! मित्राने शब्द पाळला, निवडणूक बिनविरोध होताच गावाला जलशुद्धीकरण मशिन गिफ्ट



बार्शी : तालुक्यातील धोत्रे गावात 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. त्यावेळी, सुमंत जाधवर यांचे मित्र अनिल नेवाळी यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचं सूचवलं होतं. विशेष म्हणजे गावाची निवडणुक बिनविरोध कर, मी तुझ्या गावाला जलशुद्धीकरण मशिन देतो असा शब्दही दिला होता. अनेकदा निवडणुकांवेळी राजकारणी शब्द देतात, पण ते पाळताना दिसत नाहीत. मात्र, मित्राने मित्राला दिलेला शब्द पाळून मित्रप्रेमाचं उदाहरण देत गावच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे.

#अनिल नेवाळे यांच्या #आवाहनाप्रमाणे गावात बिनविरोध निवडणूक झाली आणि सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची देशातील पहिली ग्रामपंचायत म्हणून धोत्रे ग्रामपंचायतीने इतिहास रचला. गावाचे संरपच म्हणून सुमंत जाधवर यांची निवड झाली. त्यानंतर, मित्र अनिल नेवळे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. गावात 21 जुन रोजी सदर वॉटर प्युरिफायर प्रकलापाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी, जलशुद्धीकरण मशिनचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे माजी अध्यक्ष अनिल नेवाळे तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे अध्यक्ष रवींद्र भावे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना अनिल नेवाळे म्हणाले की, हा प्रकल्प चालू ठेवण्याची जबाबदारी गावातील लोकांची आहे. गावच्या शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठीचा वर्षभराचा खर्च मी करणार असेही त्यांनी म्हटले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे अध्यक्ष रवींद्र भावे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही आपल्या गावासाठी rotary international चां कर्यांतर्गत येणारा HAPPY VILLAGE हा प्रकल्प सुध्दा राबवू. या गावातील लोकांनी या पाण्याची सवय लावून घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, गावाचे संरपच सुमंत जाधवर यांनी सर्व मान्यवरांना आपण आमच्या गावाला अजून मदत करावी अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments