बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे रमी नावाचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे गौडगाव, ता. बार्शी येथील माऊली टायर पंक्चरच्या दुकाणाच्या आडोशाला काही इसम ५२ पत्याचा रमी नावाचा जुगार खेळत आहेत अशी माहिती वैराग पोलिसांना मिळाली. रस्त्याच्या कडेला वाहन लावून पोलिसांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी चार लोक गोलाकार बसुन हातात पत्ते घेऊन जुगार खेळत असलेले दिसले. लागलीच आम्ही त्यांना गराडा घालुन जागीच पकडले ती 26 जून रोजी रात्री सव्वा आठच्या दरम्यान ही कारवाई केली.
1 ) प्रशांत प्रभाकर कदम वय 46 वर्षे, रा-गौडगाव ता बार्शी यांचे अंगझडतीमध्ये रोख रक्कम 180/-रु, 2 ) बाळासाहेब विठ्ठल आरगडे वय 49 वर्षे रा-गौडगाव ता बार्शी याचे अंगझतीमध्ये 1850/-रु रोख रक्कम, 3) अनिल रामराव काकडे वय-55 वर्षे रा-गौडगाव ता बार्शी यांचे अंगझडीमध्ये रोख रक्कम 750/- रु. 4) नागनाथ भाउराव चव्हाण वय 60 वर्षे रा-गौडगाव ता बार्शी यांचे अंगझडीमध्ये रोख रक्कम 90 रु असे एकुन 2870/- रु व 52 पानी पत्याचा डाव येणेप्रमाणे वरिल वर्णनाचा व किंमतीचे जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम मिळुन मिळून आले. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments