बार्शी कल्याण नावाचा जुगार घेणाऱ्या दोघांवर शहर गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी बस स्टँड परिसरात बोला पान शॉप च्या बाजूला जुगार घेणाऱ्या २ इसमांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी बस स्टँड परिसरात बेकायदा जुगार खेळला जात आहे, अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्या बातमीची खातरजमा करण्याकरिता शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन इसम कागदावर काहीतरी आकडेमोड करत असलेला दिसला तो जुगार खेळत असावा व खेळवीत असावा असा संशय पोलिसांना आल्याने त्याला जागीच पकडले, विनायक ज्ञानेश्वर वाघमारे (वय ३७) रा. मंगळवार पेठ बार्शी व प्रविण प्रकाश पवार (वय ४०) रा. शिवाजी आखाडा बार्शी स्वतःचे आर्थिक फायदा करिता कल्याण क्लोज नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले, त्या दोघांना विरुद्ध शहर पोलिसात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments