गौडगाव ता. बार्शी येथील रमाकांत शैलेंद्र देशमुख यांच्या घरी घरफोडी होऊन एक महिना झालेला आहे. तरी अजून पर्यंत घरफोडी करणाऱ्या चोरांचा शोध लागला नसल्यामुळे गौडगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी विशेष लक्ष देऊन तात्काळ घरफोडी करणाऱ्यांना पकडावे व देशमुख कुटुंबाचे सोने त्यांना परत मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
गौडगाव येथील रमाकांत देशमुख यांच्या घरी भर दिवसा घरफोडी करून २२ तोळे सोने अज्ञात व्यक्तीने लंपास केले आहे, रमाकांत देशमुख यांच्या सासूचे १७ मे रोजी आकस्मित निधन झाल्याने ते परगावी गेले होते, विधी उरकल्यानंतर ते घरी परतल्यानंतर घरातील आतील खोली मधील लाकडी कपाट उघडलेले अवस्थेत दिसले. त्यामधील कपडे अस्ताव्यस्त पसरले होते, सोन्याचे दागिने ठेवलेले बॉक्स रिकामे होते, त्यामुळे १७ मे रोजी रमाकांत देशमुख यांनी वैराग पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद पण केली आहे. त्यामुळे सोलापूर येथून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु श्वानपथकाला कोणताही धागादोरा लागलेला नाही.
गौडगाव येथील घरफोडी करणाऱ्या चोरांना तात्काळ पकडावे व देशमुख कुटुंबाचे २२ तोळे सोने चोरी गेले आहे ते त्यांना परत मिळावे, अशी मागणी गौडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्याकडे राहुल भड, भास्कर काकडे, युवराज काजळे, रमाकांत देशमुख यांनी केली आहे.
0 Comments