परांडा/प्रतिनिधी :
दिनांक : 3 जून 2022 , वार: शुक्रवार रोजी परांडा तालुका जिल्हा उस्मानाबाद महाराष्ट्र येथे जागतिक सायकल दिन घेण्यात आला. नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (महाराष्ट्र ) व विवेकानंद युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन घेण्यात आला. जागतिक सायकल दिनाच्या रॅलीमध्ये रामेश्वर चोबे शिरसावं ग्रा स उपस्थित होते. प्रत्यक्षात जागतिक सायकल दिनानिमित्त रॅली काढण्यात आली.
सायकलिंगच्या फायद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक साधे परवडणारे , स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल टिकाऊ वाहतुकीचे साधन तसेच मुलांसाठी आणि तरुणांसाठी शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याची पध्दत म्हणून सायकल वापरावर जोर देणे व प्रोत्साहन देणे हा संदेश तरुण पिढींना रामेश्वर चोबे व सुजित देशमुख यांनी दिला. यावेळी नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद परांडा चे स्वयंकसेक सचिन मुके तसेच युवा मंडळाच्या सदस्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी नेहरु युवा केंद्राचे परांडा तालुका युवा समन्वयक कु सचिन मुके हे उपस्थित होते.
0 Comments