महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर पडदा पडतात अगोदरच्या सरकारचे नेते म्हणजेत महाविकास आघाडीचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तापसे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर लगेचच काही वेळातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली असल्याचे महेश तपासेंनी सांगितले. २००४,२००९,२०१४ आणि २०२० च्या निवडणूक शपथपत्रा बद्दल आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे. सत्ताबदलानंतर आलेली ही नोटीस हा फक्त योगायोग आहे का आणखी काही?" असे ट्वीट महेश तपासे यांनी केले आहे.
0 Comments