एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आलीय. एका चुलत बहिणीने आपल्या बहिणीचा सामूहिक बलात्कार घडवून आणि त्यानंतर तिची हत्याही घडवली. उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खेरीमध्ये ही धक्कादायक घडना घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका 12 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आली आहे. तिच्यावर आधी सामूहिक बलात्कार केला. मग तिचा जीव घेतला. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. यानंतर त्यांनी या 12 वर्षांचा मुलीच्या मृतदेहाची अवहेलानाही केली. तिचे डोळेच नराधमांनी उपटून काढले होते. या संपूर्ण बलात्कार आणि हत्याप्रकरणी तिची बहीणच असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. यानंतर सगळेच हादरले. पीडितेची चुलत बहीण असलेल्या 19 वर्षांच्या तरुणीला पोलिसांनी या बलात्कार आणि हत्याप्रकरणी अटक केली आहे.
का केली हत्या?
आपल्या चुलत बहिणीचं एका मुलासोबत प्रेमप्रकरण आहे, हे या 12 वर्षांच्या मुलीला कळलं होतं. तिला धडा शिकवण्याच्या हेतून या मुलीच्या चुलत बहिणीने आणि तिच्या प्रियकरानं कट रचला. सहा जणांनी मिळून या 12 वर्षांच्या मुलीवर ऊसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलीच्या अंगावर असेल्या ओढणीचाच वापर करुन तिचा जीवही घेतला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या बारा वर्षांच्या पीडित मुलीचा मृतदेह ऊसाच्या शेतात विछिन्ह अवस्थेत आढळून आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे डोळेही नराधमांनी उपटून काढले होते. पोलीसही हे दृश्य पाहून हादरुन गेले होते. पोलिसांनी यानंतर पीडितेचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत पुढील तपासही केला.
चुलत बहिणीने शेतात नेलं आणि….
पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. 19 वर्षांची तरुणीच आपल्या चुलत बहिणीला ऊसाच्या शेतात घेऊन गेली होती. त्यानंतर या बारा वर्षांच्या मुलीवर चोघांनी आळीपाळीनं बलात्कार केला. यावेळी दोघे कुणी अचानक येऊ नये, यासाठी पहारा देत होते. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.
यानंतर 19 वर्षांची तरुणी घरी आली. जणू काही घडलंच नाहीये, असं या तरुणीचं वावरणं होतं. नंतर जेव्हा पीडितेचे पालक मुलीचा शोध घेऊ लागले होते, तेव्हा या तरुणीनेच ती शेतात गेली असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेप्रकरणी तरुणीची चौकशी केली. याप्रकरणी तरुणीसह सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुन्हाही नोंदवण्यात आलाय. या घटनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय.
0 Comments