पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल; धनंजय मुंडे यांचे वक्तव्य


महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. परभणी येथे एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी हे सूचक भाकित वर्तवले आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत भेद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीमध्ये सामाजिक न्याय विभागाला आपल्या क्षमतेमुळे अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचेही मुंडे म्हणाले. पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल. त्यामुळे जर समाज कल्याण विभाग कोणाकडे सोपवायचा असा प्रश्न उपस्थित झाल्यास हा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असेल, असेच मुख्यमंत्री म्हणतील. कारण या विभागाला आता खूप प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, असेही मुंडे म्हणाले.
महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये आपण पूर्वी अधिक
समर्थपणे काम केले आहे, याची मुंडे यांनीआठवण करून दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आपल्याला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते बनवलेले होते. तेंव्हा आपणच तत्कालिन सरकारला हादरे दिले होते. असेही मुंडे म्हणाले.

Post a Comment

0 Comments