बार्शी! गुळपोळी येथे शेती रस्त्याच्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी ; परस्परविरोधी तक्रारी दाखल



बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे शेती रस्त्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन आठ जणांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुळपोळी येथे शेती रस्त्याचा वाद शेख व मसाले कुटुंबियांच्या मध्ये गेल्या काही दिवसापासून चालू आहे. या रस्त्यावरून जायचे नाही, या रस्त्यावरून जाणारच असे म्हणत दोन कुटुंबीयांमध्ये मारहाण झाली असून एकमेकांना जेव्हा मारण्याची धमकी दिली आहे. नानासाहेब भिमराव मचाले (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध तर सिराज इन्नुस शेख (वय 26) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मचाले कुटुंबियातील चार जणांविरुद्ध असे परस्पर विरोधी आठ जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

Post a Comment

0 Comments