बार्शी/प्रतिनिधी:
जमीन विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे मनात बाप-लेकांनी पुतण्याला लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिले आहे.
रविराज राहूल बनसोडे वय ३२ वर्षे रा. पाटील प्लट शिवाजी नगर बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व त्यांची बहीण ज्योती घरी असताना माझे चुलते दाजी लाला बनसोडे व चुलत भाऊ अजय दाजी बनसोडे हे आमचे घरी आले व उस्मानाबाद येथील जमीन विकण्यास ना हरकत दे असे म्हणू लागले. मी सदर जमीनीचा वाद कोर्टात चालू असून ना हरकत देणार नाही असे म्हणताच माझा चुलत भाऊ आजय याने माझे डोक्यात गज मारला त्यामुळे माझे डोक्यातून रक्त येऊ लागले. तसेच माझे चुलत्याने मला शिवीगाळी करत माझे कानावर जोरदार चापट मारली व नाकावर जोरदार बुक्की मारल्याने माझे डावे कानातून व नाकातून रक्त येऊ लागले. ते पाहून माझी बहीण मला वाचविण्यासाठी मध्ये आली असता माझे चुलते दाजी यांनी तिला शिवीगाळी करुन ढकलून दिले व तुला आम्हाला ना-हरकत दयावीच लागेल असे म्हणून माझे चुलत भावाने माझे गळयातील दोन तोळयाची सोन्याची चैन काढून घेतली. तसेच माझे घरात पेट्रोलपंपावरील कलेक्शनचे आलेले 2 लाख रुपये नाहीसे झाल्याचे लक्षात आले.
दाजी बनसोडे व अजय बनसोडे यांच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम 323,324,327,34,504 व 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments