सांगोल्याच्या मेंढपाळांनी तडवळे (ता. बार्शी) येथे एका शेतकऱ्याच्या शेतात बसवलेल्या मेंढ्यामधून अज्ञातांनी दोन मेंढ्या आणि चार पिल्ले असा ८० हजारांच्या मेंढ्या
लंपास केल्या आहेत. ही घटना दहा मे रोजी रात्री घडली असून वैराग पोलिस ठाण्यामध्ये तब्बल एक महिन्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संजय माणिक माने (वय ३५) रा. कटफळ ता. सांगोला यांनी आपल्या मेंढ्या घेऊन तडवळे येथील फुलचंद माने यांच्या शेतामध्ये बसवल्या होत्या. दरम्यान १० मे रोजी दिवसभराचे काम करून झोपले असता रात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी दोन माडगळ जातीची पांढरा आणि तांबडा रंग असलेल्या मेंढ्या व त्यांची चार पिल्ले पळवून नेली. त्यानंतर मेंढपाळ संजय माने यांनी वैराग पोलिस भादवि कलम ३७९ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास ए एस आय हाळे हे करत आहेत.
0 Comments