बार्शी तालुक्यातील गाताचीवाडी शिवारामध्ये एमआयडीसी नंबर ३ दिशा हॉटेलच्या आडोशाला एक इसम देशी व विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला, पोलीस प्रल्हाद आकुलवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, मौजे गाताचीवाडी शिवारामध्ये विनापरवाना देशी व विदेशी दारू विक्री होत आहे अशी माहिती तालुका पोलिसांना मिळाली. बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक इसम पांढऱ्या पिशवीमध्ये देशी व विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 2,975 किमतीची दारू पोलीस नाईक केकान यांनी जप्त करून सोमनाथ श्रीरंग ननवरे वय-46 वर्षे, रा.वाणी प्लट बार्शी ता.बार्शी जि. सोलापुर याने बेकायदेशिरपणे, विनापरवाना देशी विदेशी दारुच्या एकुण 19 सिलबंद बाटल्या जप्त करून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या आदेशाने करण्यात आली.
0 Comments