पिकअप मधून वाहतूक होणारी १७०० लिटर हातभट्टी दारु जप्त सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई



सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 3 जून रोजी सकाळी सोलापूर – बार्शी रोडवरील वैराग गावच्या हद्दीतील, हॉटेल चंद्रदिप समोरील रोडवर, वैराग ता.बार्शी जि.सोलापूर या ठिकाणी अवैध हातभट्टी दारु वाहतुक करणारे वाहन हातभट्टी दारुसह जप्त करुन रु.5.86 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
              
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 जून पासून अवैध हातभट्टी ठिकाणे व त्या ठिकाणांपासून गावोगावी अवैधरीत्या वाहतूक केल्या जाणा-या हातभट्टी दारुविरोधात मोहिम सुरु केली आहे. याच मोहिमे अंतर्गत दिनांक 3 जून रोजी  रोजी गुप्त बातमीदारामार्फ़त बातमी मिळाली की, सोलापूर – बार्शी रोडवर अवैध हातभट्टी दारुची वाहतुक होणार आहे, त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक  विभाग, सोलापूर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सोलापूर – बार्शी रोडवरील वैराग गावच्या हद्दीत सापळा लावून महिंद्रा मॅक्स पिकअप  क्र. MH-08-H-8064 हे वाहन अडवून त्याची तपासणी केली असता वाहनामध्ये हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण 17 रबरी ट्युब मिळून आल्या. या कारवाईत एकूण 1700 लिटर हातभट्टी दारु व वाहनासह एकूण रु. 5 लाख 86 हजार सातशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे 1.विजय मानसिंग चव्हाण रा.बक्षी हिप्परगा ता.द.सोलापूर जि.सोलापूर, 2.किरण राम पवार रा.शिवाजी नगर खडकी तांडा ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद या 02 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
          
सदरची कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप, विभागीय उपआयुक्त पुणे विभाग श्री अनिल चासकर , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूर चे  दुय्यम निरीक्षक श्री. एस.ए.पाटील, दुय्यम निरीक्षक श्री. एस.डी.झगडे,जवान श्री. पी.एस.सावंत. एन.एन.वेळापूरे, कु.पी.बी.कुटे व डी.एम.वाघमारे  यांच्या पथकाने पार पाडली.
            
मागील 3 दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण 2880 लिटर हातभट्टी दारु, 9 लिटर देशी दारु, 2 लिटर विदेशी दारु, 900 लिटर गुळमिश्रित रसायन व 135 लिटर ताडी जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालात 2 चारचाकी वाहन व 3 दुचाकी वाहनांचा समावेश असून मुद्देमालाची किंमत रु. 11 लाख़ 60 हजार इतकी आहे.
आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असुन अवैध दारू विक्री, निर्मीती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मी,ती/वाहतुक/विक्री/साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments