नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या विद्यमानाने विवेकानंद युवा मंडळ व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या सहकार्यातून शिरसाव या गावांमध्ये ५ जून म्हणजेच पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संगोपन या उद्देशाने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
यापूर्वी गेल्यावर्षी पर्यावरण दिनानिमित्त शिरसाव या गावामध्ये विवेकानंद सेवा मंडळ महालक्ष्मी फाउंडेशन सिरसाव यांच्या प्रयत्नातून तीन हजार वृक्ष लागवड केली होती, ती वृक्ष लागवड अतिशय योग्य प्रकारे त्याचं संगोपन करण्यात आलेला आहे. या उपक्रमासाठी गावचे सरपंच सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याचे मुख्याध्यापक, समाधान चोबे, सामाजिक वनीकरणाची अधिकारी पदाधिकारी हे उपस्थित होते. अशी माहिती विवेकानंद युवा मंडळाचे सचिव रामेश्वर चोबे यांनी दिली.
0 Comments