खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी



भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रात्री उशिरा व्हॉट्सअॅप कॉल केला. आपण इक्बाल कासकरचा माणूस असल्याचे सांगून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सांगितले की, तुला लवकरच मारले जाईल. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तो कॉल रेकॉर्डिंग केला.

त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर पोलिसांनी कलम ५०६ आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. खासदार झाल्यापासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अनोळखी नंबरवरून अनेक धमकीचे मेसेज आणि कॉल आले आहेत.

Post a Comment

0 Comments