कोल्हापूर/ प्रतिनिधी:
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पदव्युत्तर स्तरावरील एक वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे.
ऑनलाईन जर्नालिझम या अभ्यासक्रमात युट्यूब चॅनल, वेब पोर्टल, डेटा जर्नालिझम, मोबाईल जर्नालिझम, डॉक्युमेन्ट्री, शॉर्ट फिल्मस, व्हिडिओ एडिटिंग, शूटिंग आदी विषयांचे ज्ञान दिले जाते. प्रात्याक्षिकावर आधारलेल्या या अभ्यासक्रमातून नोकरीसह स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. अधिक माहितीसाठी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव (मो. 9881191229) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments