मंगळवेढा! बोराळे येथून एक लाखाची देशी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई



खात्रीलायक मिळालेल्या बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक श्री कदम यांनी त्यांच्या पथकासह मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावात एका ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणाहून देशी दारूचे ३० बॉक्स जप्त करण्यात आलेले आहे.

सविस्तर माहिती अशी की, २३ जून गुरुवारी दुपारच्या सुमारास निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग श्री कदम, दुय्यम निरीक्षक सांगोला श्री छत्रे व जवान तानाजी काळे व जवान नि वाहन चालक नवले यांच्या पथकाने मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावाच्या हद्दीत नकाते वस्ती मधील एका पडक्या घरात धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपी नामे पांडुरंग विठ्ठल कोळी, वय ३४ वर्षे, राहणार उचेठाण, तालुका मंगळवेढा याने अवैधरित्या दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेले देशी दारू संत्र १८० मिली क्षमतेचे ३० बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत, जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख आठशे रुपये इतकी असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास श्री एस. एस.कदम, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments