सोलापूर:
पासपोर्ट मिळण्यात आम्ही व्हेरिफिकेशन व पत्ता पडताळणी करण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गणपत शिंदे (वय ५७) व व ट्रॅव्हल्स चालक सलाउद्दीन लायक अली मुल्ला (वय ४६) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पासपोर्ट पडताळणी व व्हेरिफिकेशन साठी दीड हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. ती लाचेची रक्कम सलाउद्दीन मुल्ला यांच्या फोन पे क्रमांकावर पाठवण्यात आली. पडताळणी मध्ये त्या गोष्टी निष्पन्न नाही झाले आहेत त्यामुळे वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व पोलिस उपाधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अजून करण्यात आली आहे. या सापळा पथकामध्ये पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, घुगे, घाडगे, जानराव, किणगी, सोनवणे, सणके, पकाले व सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments