सहकारी संस्था कार्यलयाच्या कामाचा शुभारंभ


बार्शी-  कृषी उत्पन्न बाजार समिती,बार्शीच्या व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यलयाचे भूमिपूजन  सहाय्यक निबंधक अमोल निरडे  यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत होते. 

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीची वाटचाल प्रगतीपथावर असून सहकार खात्याचे कार्यालयाचा प्रश्न कायमचा मिटावा म्हणून बाजार समितीच्या वतीने २४ लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करून घेऊन कार्यालय बांधण्यात येत असल्याचे रणवीर राऊत याप्रसंगी म्हणाले.

कार्यक्रमास बाजार समिती संचालक रावसाहेब मनगिरे , चंद्रकांत मांजरे, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सचिन महाडिक , मनिषा गुप्ता, विलास रेणके ,तुकाराम जगदाळे ,पत्रकार गणेश भोळे व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष दामोदर काळदाते , सचिन मडके व व्यापारी असोसिएशन सदस्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments