लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, लातूर जिल्ह्यातील निलंगा चे तहसीलदार गणेश जाधव आणि एका व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दीड लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. अवैध वाळू वाहतूक नियमितपणे चालून देण्यासाठी कोणतीही कारवाई न करण्यासाठी हि लाच तहसीलदार यांनी स्वीकारले आहे. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात तहसीलदार गणेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांच्या हद्दीतून वाळू वाहतूकीच्या गाड्या चालू करुन देण्यासाठी एका तक्रारदाराकडून प्रति ट्रक ३० हजार रुपये मागणी होत असल्याने वाळू व्यापारी त्रस्त झाले होते. अशाच एका वाळू व्यापाऱ्यास त्यांनी तीन ट्रकचे १ लाख ८० हजार रुपये मागितले. तर तडजोड अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
0 Comments