बार्शी! दारूची उधारी का करता असे पत्नी म्हणाली असता लाकडाने केली मारहाण


बार्शी तालुक्यातील गाताचीवाडी येथे दारूची उधारी का करता असे म्हटल्यामुळे पतीने चुलीतील लाकडाने पत्नीला मारहाण केली आहे. शिला परमेश्वर भोसले (वय ४५) रा. गाताचीवाडी ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पतीवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, नवरा परमेश्वर मलिकाअर्जुन भोसले हा दारु पिवुन आला त्यास तुम्ही दारु पिवुन दारुची उदारी जास्त का करता असे म्हणाल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन चुलीजवळ पडलेले लाकुड उचलुन माझे डावे डोळ्याजवळ, डावे खांद्याजवळ,डावे पायाच्या मांडीवर, व पिडरी माराहण करुन जखमी केले आहे. तसेच मुलगी अमृता हिने आमचे भांडणे सोडवत असताना तिलाही कलुन दिले व मला म्हणाला तुला आता जिवंत ठेवत नाही. त्यांच्यावर भादवि कलम ३२३,३२४, ५०४ व ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments