सोलापूर! एसआरपीएफ पोलिसासह ६ जणांनी मिळून केली मारहाण


सोलापूर-विजयपूर महामार्गावरील नांदणी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून एसआरपीएफ पोलिसाच्या गाडीतील सहा जणांनी मिळून टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल झाला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एसआरपीएफ पोलीसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेली गाडी ही एस आर पी एफ पोलिसांची आहे. ती गाडी व आतील तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नागेश भीमाशंकर स्वामी (वय वर्षे 28), राहणार टोलनाका, नांदणी, ता. दक्षिण सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत फिर्यादी भीमाशंकर स्वामी, आनंद राठोड, महांतेश सोनकंटले जखमी झाले आहेत.

रोहन सुरेश जाधव (वय वर्षे ३०), गजानन  आणाराव कोळी (वय वर्षे २९), दोघे राहणार सैफुल, सुरज बबनराव शिकारे (वय वर्षे ३१), एसआरपीएफ पोलीस शिपाई शिवशंकर बबनराव शिकारे (वय वर्षे २५)राहणार उद्धव नगर, सैफुल! सोलापूर व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी हे सर्व जेवण करायला टाकळी येथे  (इनोव्हा त्याचा क्रमांक एम एच ०२ एक क्यू ४४५५) मधून गेले होते. जेवण करून येत असताना शनीवार, दि. 4 जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास, नांदणी येथील टोल नाक्यावर टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. दरम्यान गाडीतील चौघांनी तलवारी हातात घेऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच टोलनाक्याच्या कार्यालयाचे तोडफोड करून नुकसान केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित करपे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments