भेटण्यास नकार दिला म्हणून विवाहितेचा नग्न फोटो ठेवला व्हॉट्सअप स्टेटसला


याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात राहणाऱ्या विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण मच्छिंद्र वीर (रा. रांजनगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीची बहीण २६ वर्षीय फिर्यादी महिलेच्या शेजारी राहत होती. तो बहिणीकडे सप्टेंबर २०२१ मध्ये आला असताना दोघांची ओळख झाली. तिचा पती कामाला गेल्यावर आरोपी तिच्या घरी बसण्यासाठी येत होता. यातून त्याने तिच्याशी गोड बोलून शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर या दोघांच्यात वारंवार विवाहितेच्या राहत्या घरी, लॉजवर शरीरसंबंध येऊ लागले. त्याने त्यावेळी व्हिडीओ व फोटो काढले. फेब्रुवारी २०२२ मध्ये तो त्याच्या गावी निघून गेला. त्यानंतर २५ एप्रिल २०२२ रोजी त्याने फोन करत फिर्यादीला लॉजवर भेटायला बोलावले. तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्याने तिने भेटण्यास नकार दिला.

भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीने या विवाहितेशी सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित करताना व्हिडीओ आणि फोटो काढले होते.

Post a Comment

0 Comments