सोलापूर! डाटा एन्ट्री ऑपरेटर व रोजगार सेवक २०० रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या ताब्यात



दिवसेंदिवस लाचखोरीचे हे प्रमाण वाढत चालले आहे, त्यातच किरकोळ चिरीमिरी च्या नादात गेल्या महिनाभरातील ही चौथी कारवाई आहे. केवळ २०० रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी माळशिरस पंचायत समितीतील डाटा एन्ट्री ऑपरेटर व रोजगार सेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

अभिजीत भारत गिरीगोसावी, वय २४, पद- डाटा एन्ट्री ऑपरेटर, (कंत्राटी) माळशिरस पंचायत समिती कार्यालय, माळशिरस रा. पंढरपूर २. सर्जेराव बाबुराव लोखंडे, वय- ४५ पद- रोजगार सेवक, (रोजगार हमी योजना) मारकडवाडी ग्रामपंचायत, ता. माळशिरस, जि. सोलापूर या दोघांना अँटी करप्शन ही कारवाई करून ताब्यात घेतले आहे.

यातील तक्रारदार यांना रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत घरकुल मंजुर झाले असून बांधकामाचे जॉबकार्ड व हजेरीपट देण्यासाठी माळशिरस पंचायत समिती कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर अभिजीत भारत गिरीगोसावी यांनी प्रत्येक हजेरीपटास २००/- रू. याप्रमाणे १०००/- रू. लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर या कार्यालयाकडे दि. ०९/०६/२०२२ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.

सर्जेराव बाबुराव लोखंडे यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर येथील पथकाने रंगेहात पकडले आहे. सदर प्रकरणात दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार पोना प्रमोद पकाले, पोकों उमेश पवार, पोकों गजानन किणगी, चापोकों शाम सुरवसे, यांनी केली.

Post a Comment

0 Comments