धक्कादायक! पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केला मित्राचा खून



औरंगाबाद मधील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरखेड शिवारात मित्रानेच मित्राचा पत्नीसोबत अनैतिक असल्याच्या संशयावरून काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. १८ जून रोजी शनिवार सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

 गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे १८ जुन शनिवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास वरखेडचे पोलीस पाटील यांनी माहिती दिली की, बाराहाते यांच्या शेतात एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत पडलेले आहे. या माहितीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंच्छिंद्र सुरवसे हे पोलीस अमंलदारसह तात्काळ घटनास्थळी भेट देवून मृतदेहाची पहाणी केली. अनोळखी व्यक्तीस कोणी तरी अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने मारुन टाकले असावे, असा संशय आल्याने लगेच तपासाचे चक्रे फिरवून मृताची तांत्रिक पद्धतीचा वापर करून ओळख पटविली. मृताचे नाव अमन मधुकर निकम (वय 23 वर्षे रा. गंगापूर) असे निष्पन्न झाले.

 मृत अवस्थेत असलेल्या अमन निकम यास कोणत्या कारणावरून कोणी मारून टाकले असावे याबाबत तपासाचे चक्र फिरवून तीन पोलीस पथक तयार करून वेगवेगळ्या दिशाने पाठवून तपास करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित सागर उर्फ सोनू लक्ष्मण कुऱ्हाडे, वय 25 वर्ष रा. रमाईनगर गंगापूर यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. अमन निकम याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात बाळगून आरोपी रात्री मित्र दिपक यास कोपरगाव येथे मोटर सायकलवरून सोडण्यास गेला होता. तेथून परत येताना वरखेड शिवारात निर्जनस्थळी नेवून आरोपीने अमनला जाब विचारून त्याची हातरुमालाने गळा अवळून जागेवरच हत्या केली व शेतात मृतदेह टाकून पसार झाला.

Post a Comment

0 Comments