बार्शी येथील शिवशक्ती मैदानाच्या मागे ब्रह्मचैतन्य नगर मध्ये भाड्याच्या खोलीत मैत्रिणींसमोर राहणाऱ्या बारावीत कमी गुण मिळाले म्हणून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सृष्टी संजय बोंदर (वय 18) राहणार देव धानोरा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद वाशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन रूम मध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेची फिर्याद राजेंद्र मुंडे वय 52 रा. पवार प्लॉट उपळाई रोड बार्शी यांनी शहर पोलिसांत दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ वीच्या परीक्षेमध्ये तिला ८० ते ९० टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती परंतु ६६ टक्के गुण मिळाले त्यामुळे तिने नाराज होऊन लोखंडी दरवाजा चांगला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे, या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल घोडके हे करत आहेत.
0 Comments