गौडगाव ता. बार्शी येथे कृषी दिनाचे औचित्य साधून, तालुका कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन पिकाचे उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
गौडगाव सर्कल मध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. सोयाबीन पिक शेतकऱ्यांना दोन पैसा मिळवण्याचे साधन आहे, त्या पिकाचे उत्पन्न कसे वाढावे, बियाणे खरेदी करताना घ्यायची काळजी, सोयाबीनची विविध वाण तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व विक्री व्यवस्थापन याविषयी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी शेतकऱ्यांना चर्चेतून मार्गदर्शन केले.
यावेळी जगताप एन.बी कृषी पर्यवेक्षक, महागडे बी.एस कृषी पर्यवेक्षक, चापले डी.के., ढेकळे, शेळके कृषी सहाय्यक तसेच सहदेव भड, अरुण भड, हिराचंद शिंदे, राहुल भड, काकासाहेब भड, बालाजी पैकेकर, भास्कर काकडे, नवनाथ काजळे, महादेव चव्हाण, युवराज काजळे, अनिल यादव, मदन नन्नवरे, अमर घुगे आदी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments