मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही म्हणून जमावाने डॉक्टर दांपत्याला शिवीगाळ मारहाण करुन रोख रक्कम नेल्याची प्रकार समोर आलं. मोहोळ पोलिसात आठ मुख्य आरोपींसह अन्य २० अशा एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रेरणा बाबर व डॉ. संतोष दिनकर बाबर यांच्यावर जमावाने हल्ल केला.
मोहोळ पोलीस ठाण्यात अतुल बनसोडे, दीपक वाघमारे, विश्वास वसेकर, संजय सोनटक्के, गणेश शेटे, अमोल गवळी, कसबे, कदम, व अन्य २० लोक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
डॉ. संतोष दिनकर बाबर यांचे टाकळी सिकंदर येथे अनया नावाचे हॉस्पीटल आहे. याठिकाणी दिवस रुग्णावर उपचार केला जातात. डॉ. संतोष बाबर हे रात्री पंढरपूर येथील एका रुग्णालयात सेवा देत असल्यामुळे रात्री रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जात नाही. अतुल बनसोडे हे आपल्या मुलाला उपचारासाठी बाबर यांच्या अनया हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. डॉ. संतोष बाबर हे बाहेर गावी होते. डॉ. बाबर हे आपल्या हॉस्पीटलमध्ये आले. यावेळी रुग्णालयातील लॉक तुटलेले दिसले. शरण गावडे व अरविंद वाघमारे यांच्याकडे चौकशी केली असता, गावातील अतुल बनसोडे याने आठ ते दहा जणांसह बाह्यरुग्ण कक्षाचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि डॉक्टरांच्या दोन्ही मदतनिसांना मारहाण करून काउंटरमध्ये ठेवलेले आठ ते दहा हजार रुपये घेऊन गेले असल्याचे सांगितले. डॉ. बाबर यांनी बनसोडे यांना केला असता. डॉक्टरांनी त्याला मी दवाखान्यात नसताना माझ्या दवाखान्यात गोंधळ का घातला? अशी विचारणा केली. त्यानंतर दुपारी बारा वाजता अतुल बनसोडे हा पुन्हा एकदा २० ते २५ लोकांना घेऊन अनया हॉस्पिटलमध्ये आला. यावेळी त्याने व त्याच्या साथीदारांनी डॉक्टर, त्याची पत्नीला अश्लील शिवीगाळ केली व मदतनिसांना देखील मारहाण केली. या प्रकरणी डॉ. संतोष बाबर यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील आठ जणांसह एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments