बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे झालेल्या भांडणावरून बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यातील मुख्य संशयित आरोपी फिरोज आतार यास डीवायएसपी बार्शी यांनी दि. १० एप्रिल २०२२ रोजी अटक केली होती. यानंतर आरोपीने बार्शी येथील सत्र न्यायालयात अॅड. रियाज शेख यांचे मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
सदर जामीन अर्जास मूळ फिर्यादी व सरकारी अभियोक्ता यांनी जोरदार विरोध केला होता. आरोपीचे वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालयवबार्शीचे न्यायाधिश जगदाळे यांनी आरोपीस अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. रियाज शेख व सरकारी पक्षाकडून अॅड. बोचरे यांनी काम पाहिले.
0 Comments