सोलापूर! ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील जबरीचोरीचा गुन्हा उघडकीस, दोन चोरटे जेरबंर ; मुद्देमाल हस्तगत



दिनांक 14/06/2022 रोजी पहाटे 1ः30 वा. चे सुमारास मौजे गुरसाळे ता. माळशिरस जि. सोलापूर येथे 02 अज्ञात चोरटयांनी फिर्यादी मोहन शंकर गायकवाड, वय 62 वर्ष, रा. गुरसाळे ता. माळशिरस  यांचे राहते घराचे बाथरूमच्या खिडकीचे काचा काढून घरात प्रवेष करून सुमारे 68,000 रू. किं. सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने काढून घेवून नेले म्हणून नातेपुते पोलीस ठाणे गुरंन 193/2022 भादविसंकाक 458, 392  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वप्निल शरद पवार, वय 30 वर्ष व सुरज बाबुराव जगताप, वय 24 वर्ष दोघे रा. गुरसाळे तालुका माळशिरस या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ज्येष्ठ नागरिक यांचेवर झालेल्या गुन्हयांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप यांना विशेष लक्षदेवून गुन्हा उघडकीस आणणेकामी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोनि सुहास जगताप यांनी गुन्हे शाखेकडील त्यांचे पथकास नातेपुते या पोलीस ठाणे हद्दीतील जबरीचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नातेपुते भागात असताना,  त्यांना तांत्रिक विष्लेशणावरून व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे गुरसाळे ता. माळषिरस येथील जबरीचोरीचा गुन्हा हा त्याच गांवातील 02 इसमांनी मिळून केला असून त्यातील एकास गांवातून व दुस-यास फलटण येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्या दोघांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना गांवातील इसमाची चोरी कसेकाय केले याबाबत विचारपूस करता, त्यातील एका आरोपीचे फिर्यादीचे घरी जाणेयेणे होते. 
देणेकरींचे हातउसने घेतलेले पैसे देणेकरीता, त्यांचे ओळखीचे यातील फिर्यादी मोहन गायकवाड हे सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांचेकडे मोठयाप्रमाणात पैसे मिळून येतील व तसेच त्यांचे घरी विरोध करण्यासारखा कोणताही व्यक्ती नसल्याने, व घरातील वस्तूस्थितीची सर्व माहिती असल्यांने त्यांनी सदरचे घर हेरून जबरीचोरीचा गुन्हा केला असल्याचे सांगून गुन्हयातील मंगळसूत्र, 02 मोबाईल, गुन्हयातील कोयता , इत्यादी गुन्हयातील मुद्देमाल काढून दिला. सदर गुन्हयाचा तपास नातेपुते पोलीस ठाणेचे सपोनि मनोज सोनवलकर हे करीत आहेत.

सदरची उल्लेखणीय कामगिरी पोलीस अधीक्षकतेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, यांचे नेतृत्वाखाली पोहेकाॅ/ नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments