रिंकू राजगुरुच्या नव्या लूकने लावले वेड



मराठी चित्रपटसृष्टीमधी प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या दिग्दर्शक नागराज मंजूळे याच्या सैराट या धमाकेदार चित्रपटानंतर आणखी एक नवा चित्रपट येत आहे. रिंकूचा आगामी 'आठवा रंग प्रेमाचा' हा चित्रपट चाहत्याच्या भेटीस येत आहे. परंतु, सध्या रिंकू राजगुरुचा मराठमोळा लूक  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अभिनेत्री रिंकू राजगुरुने तिच्या इंन्स्टाग्रामवर  नुकतेच भगव्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या साडीसोबत तिने ग्रीन रंगाचे सिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. यावेळी केसांचा अंबाडा, मेकअप आणि साजेशीर दागिन्याने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील खास म्हणजे, रिंकूने दागिन्यामध्ये भरजरी नेकलेस परिधान करून चारचाँद लावले आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'एक हुनर है चुप रहने का...
इक ऐब है कह देने का...' असे लिहिले आहे. यातील फोटोना पोझ देताना तिने कधी आपले हाथ एकमेंकावर तर कधी आपल्या गाळावर ठेवल्याचे दिसते. या फोटोतून तिने शांत राहणे हे देखील संयमाचे असल्याचे दाखवून दिले आहे. याशिवाय तिचा आणखी एक व्हिडीओ शोशल मीडियावर शेअर झाला आहे.
या व्हिडीओमध्ये रिंकू एका ऑफिसमध्ये असून तिथे एक अचानक ऑफिस बॉय येतो. यानंतर रिकू त्याला लांबूनच हाताने खूणवत स्वत: येत असल्याचे सांगते. यानंतर ऑफिस बॉयच्या चेहऱ्यावर हसू फुलते. मात्र, क्षणार्धात ती ऑफिस बॉयचा हात बाजूला करत त्याच्या पाठीमागे असणाऱ्या हॅडसम व्यक्तीकडे जाते. हे पाहून ऑफिस बॉयच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. हा भन्नाट व्हिडिओ शेअर होताच कॉमेन्टचा पाऊस पडत आहे.

Post a Comment

0 Comments