सकाळी उठून आपला मोबाईल चार्जिंगला लावत असताना दुसऱ्या वायरला पीन नसल्याने त्या वायरला चुकून हात लागल्याने विजेचा धक्का बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे गुरुवारी सकाळी घडली आहे.
श्रीशैल गजानन सारोळे (वय २५, रा. मंद्रुप) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी श्रीशैल सारोळे हा युवक आपल्या आई व विवाहित भावासह मंद्रुप- वांगी रस्त्यावरील हनुमान नगर परिसरातील आपल्या शेतात राहत होता. बुधवारी रात्री श्रीशैल जेवण करून झोपी गेला. गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान झोपेतून उठून तो आपला मोबाईल चार्जिंग करण्याकरिता घरातील स्वीच बोर्डाजवळ गेला. यावेळी मोबाईल चार्जिंग लावत असताना त्या स्वीच बोर्डवर अजून एका घराबाहेरील बल्बचे कनेक्शन होते. त्या वायरला पीन नसल्याने एक वायर बोर्डात तर एक वायर बाहेर होती. यातील एका वायरला श्रीशैलचा चुकून हात लागला. त्यामुळे त्याला विजेचा जोरात धक्का बसल्याने तो लांब फेकला गेला. त्यांनी तत्काळ श्रीशैलला उपचारासाठी मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयास आणले. यावेळी डॉक्टरने त्याला तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. पत्रकार राजकुमार सारोळे यांचा तो पुतण्या होता.
0 Comments