सोलापूरमध्ये फौजदार १२ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला


सोलापूर/प्रतिनिधी:

दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे, अशातच २४ जून रोजी सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षकाला १२ हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरच्या पथकाने सोलापूर रेल्वे पोलीस चौकीतच रंगेहात पकडले. प्रशांत सुर्यकांत क्षीरसागर वय ३४ वर्ष, पद- पोलीस उपनिरीक्षक नेमणूक- सदर बझार पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे स्टेशन पोलीस चौकी,असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.

 यातील आलोसे प्रशांत सुर्यकांत क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक सदर बझार पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे स्टेशन पोलीस चौकी, सोलापूर शहर यांनी तक्रारदार तसेच त्यांच्या ओळखीच्या इसमाच्या गाडयांवर कोणतीही कारवाई न करण्याकरिता मासिक हप्ता स्वरुपात १३,००० रुपयांची मागणी करून तडजोडी अंती १२,००० रुपये स्विकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम रेल्वे स्टेशन चौकी सोलापूर येथे स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

सदरची कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार, पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोना अतुल घाडगे, पोना प्रमोद पकाले, पोकों उमेश पवार, पोकों शाम सुरवसे सर्व नेमणूक एसीबी, सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

Post a Comment

0 Comments