उसन्या पैशाच्या कारणावरून दोघांना लाकडी दांड्याने मारहाण केल्यामुळे फिर्यादी दिपक उत्तम घोलप (वय ३६) वर्षे रा. एकवीराई चौक कसबापेठ बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, २९ जून रोजी दुपारी चारच्या दरम्यान फिर्यादी दीपक घोलप व त्यांचा मित्र सोनू चव्हाण यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्याने पैशाच्या या कारणावरून मारहाण केल्याची घटना बार्शी लातूर बायपास रोडवरील स्वामी समर्थ मंदिराजवळील हॉटेल राधेगौरी येथे घडली आहे. यामध्ये फिर्यादी हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल झांबरे , तुळशीराम भोलसे, महेश गुंड, मयुर धामणेकर, केतन धामणेकर, भय्या गावडे सर्व रा. उपळाई रोड बार्शी यांच्या विरोधात भादवी कलम १४३,१४४,१४८,१४९, ३२३ व ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments