14 जून रोजी 3.17 मिनिटांनी 'आईच्या गावात अन बाराच्या भावात' या फेसबुक अकाउंट वरून रूपाली चाकणकर यांनी मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या नवऱ्याने ही त्याचा हट्ट धरला नाही अशा आशयाची पोस्ट रूपाली चाकणकर यांनी केली होती.
अशा आशयाच्या पोस्टवर आपले मत काय असे विचारले असता युवराज चंद्रकांत ढगे राहणार प्रसन्नदाता मार्ग बार्शी याने फेसबुक अकाउंट वरून दुसरा नवरा हवा असेल बारामतीचा म्हणून उत्तर दिले आहे त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी समाजाला सत्यवानाची सावित्री कळली पण ज्योतिबाची कळली नाही असे वक्तव्य आईच्या गावात अन बाराच्या भावात या फेसबुक अकाउंट केली आहे असे विचारण्यात आले त्यावेळी युवराज ढगे यांनी आधार वडाला फेरी मारल्यानंतर वडाला फेरी मारण्याची गरज नाही असे उत्तर देऊन रूपाली चाकणकर यांना महिला असल्याचे माहित असून सुद्धा युवराज ढगे यांनी फेसबुक अकाउंट वरून म्हणाला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले.
त्यामुळे सुवर्णा किशोर शिवपुरे वय 48 राहणार पाटील चाळ तुळजापूर रोड बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार युवराज ढगे यांच्यावर भादवि कलम 309 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 67 नुसार 15 जून रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
0 Comments