अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर तर शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे प्रसाद लाड व काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांच्यामध्ये चुरस लागली होती. लाड यांना पहिल्या पसंतीची १७ आणि जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मते व चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंती ची २२ मते पडली होती. पण दुस-या
फेरीत या जागेच्या निकालामध्ये फडणवीस यांचा चमत्कार कायम राहिला असून! प्रसाद लाड 'इन' तर चंद्रकांत हंडोरे या निवडणुकीतून 'आऊट' झाले आहेत. त्याबद्दल फडणवीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विजयी उमेदवार:
राष्ट्रवादीचे: 1) एकनाथ खडसे, 2) रामराजे निंबाळकर.
शिवसेनेचे: 1) सचिन अहिर, 2) आमश्या पाडवी.
काँग्रसचे: 1 ) भाई जगताप.
भाजपचे: 1) उमा खापरे, 2) प्रवीण दरेकर, 3) राम शिंदे,
4) श्रीकांत भारतीय, 5 ) प्रसाद लाड
0 Comments