शिंदे गटात सामिल होण्यासाठी ५० कोटींहून अधिकची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. याशिवाय दोन चारचाकी वरुन फुटेज असल्याचा दावा आमदार राजपूत यांनी केला आहे. १०० कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते औरंगाबादचे कन्नडचे आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधातील बंडाला नवे वळण मिळणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करण्यासाठी ५० कोटीहून अधिकची ऑफर होती, असा दाना त्यांनी केला आहे. या ऑफरसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, याहून अधिकची ऑफर होती. याबाबत माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मी गद्दारी केली आहे. १०० कोटी दिले असते तरी मी गद्दारी केली नसती असंही ते म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतीही गद्दारी करणार नाही. मला ऑफर होती मात्र मी गद्दारी केली नाही असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडीं मुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागले आहे. शिंदे गटातील नेत्यांना आता केंद्रानेही सुरक्षा पुरवली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना आता डिस्चार्ज मिळल्याने सर्व यंत्रणा आता हालणार असल्याची चर्चा आहे. आता केंद्रासह या आमदारांच्या सुरक्षेसाठी राज्यपालांनीही एक पत्र मुंबई पोलिसांना लिहले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
0 Comments