बार्शी! हातचलाखीने 50 हजार रुपये ठेवलेली पिशवी पळवली; दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

फिर्यादी बजरंग नागनाथ जाधव (वय ७०) राहणार राऊत चाळ बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील तेलगिरणी चौक येथे शेजारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळ पैसे काढून फिक्स डिपॉझिट मध्ये काढलेले कर्ज ५०हजार किमतीच्या नोटा असलेली पिशवी मोटर सायकल ला अडकवली होती. मोटरसायकल घेऊन जात असताना तुमचे पैसे खाली पडले आहेत.

असे अनोळखी इसम तेव्हा ते पैसे उचलण्यासाठी खाली वाकला असता पन्नास हजाराच्या नोटा ची पिशवी घेऊन दोन अज्ञात चोरटे पसार झाले आहेत, पन्नास हजार रुपये रोख सेन्ट्रल बँकेची पावती केळकर पतसंस्थेचे पासबुक दोन अनोळखी व्यक्तीने चोरून नेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments