बार्शी! काटेगाव येथून जाण्याऱ्या 1100 किलोवॅटच्या विजेच्या तारा तुटून जळून खाक


काटेगाव येथून जाण्याऱ्या ११०० KV च्या विजेच्या तारा तुटन जळून खाक,आज पहाटे च्या सुमारास काटेगाव  कळबवाडी रोड  अशोकनगर येथून भर वस्तीतून जाणाऱ्या विजेच्या तारा शॉर्ट सर्किट होऊन जळल्या आहेत, या तारांना सुरक्षा गार्ड देखील नाही,पाऊस चालू असताना ह्या तारा तुटल्या होत्या बाजूला घरे जनावरांचे गोठे तसेच कडब्याची गंज सुद्धा होती सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

परंतु सुरक्षा गार्ड बसवण्यासाठी गेल्या वर्षी  दिनांक 27-07-2021 रोजी ग्रामसेवक /सरपंच यांच्याकडे  स्टार सोशल फौंडेशन चे अध्यक्ष अमीन गोरे यांनी अर्ज केला होता,मात्र आज करू उद्या करू अशी टोलवा टोलवी च्या उत्तरा व्यतरिक्त कुठलंही काम ग्रामपंचायत काटेगाव यांच्या तर्फे झालेलं नाही यावरून ग्रामपंचायत काटेगाव यांच्या भोंगळ कारभाराची चर्चा मात्र सर्व काटेगाव परिसरात होत आहे,आता ह्या विषयावर महा वितरण कंपनी ,ग्रामपंचायत काटेगाव सुरक्षा पाऊल उचलणार की जो पर्यंत मोठी जीवित हानी होणार नाही तो पर्यंत वाट बघणार आहेत का हा मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.

Post a Comment

0 Comments