लग्नाचे आमिष दाखवून सोशल मीडियावरील मैत्रिणीने १५ लाखांचा गंडा

ठाणे/प्रतिनिधी

सोशल मीडियावर मैत्री झालेल्या महिलेने या तरुणाला लग्नाचे आमिष आणि त्यानंतर कस्टमने पकडलेले सोने सोडविण्यासाठी त्या महिलेने तब्बल १४ लाख ९६ हजार रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेसह तिच्या अन्य साथीदारांच्या विरोधात खडकपाडा पोलिसांना फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संकर भिमसेन ससमल (वय३७) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेत संकर भिमसेन ससमल हा तरुण राहतो. त्याची १९ एप्रिल ते ९ मे दरम्यान अनिता रंजन नामक महिलेने भारत मेट्रोमनीच्या ओरियामेट्रोमनी या अॅप्लीकेशनवर रजिस्टर केलेल्या प्रोफाइलवरून संकर ससमल यांच्याशी संपर्क साधला होता. संकर यांच्याशी या महिलेने मैत्री केली. त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. संकर यांनीही या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. या महिलेने दिल्लीमध्ये कस्टम डिपार्टमेंटने पकडले आहे, असे भासवले. तिने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने आम्ही कस्टम ऑफिसर आहोत, अशी ओळख सांगून संकर ससमल यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला आणि त्यांना बँकेचा अकाऊंट नंबर पाठवून त्यांच्याकडून १४ लाख ९६ हजार रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.

 फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments