सोलापूर! ३०० रुपयांची लाच स्विकारताना महिला लिपिकास पकडले रंगेहात



सोलापूर/प्रतिनिधी:

महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ येथील महिला लिपिकास तीनशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. प्रभावती अंबादास वाईटला (कस्सा) वय ५८ (पद - लिपीक, नेमणूक म. न. पा.प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापुर रा. माधव नगर, लक्ष्मीनारायण टॉकिज जवळ, सोलापुर) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांच्या मुलीचे आरटीई २५ टक्के अंतर्गत सोलापुर सोशल आसोशियसन्स न्यु इंग्लिस स्कुल, सोलापुर येथे नंबर लागला असुन त्या अनुषंगाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, कार्यालय सोलापुर येथुन कागदपत्राची पडताळणी १३.०५.२०२२ रोजी तक्रारदार यांना देवून केलेल्या शासकीय कामाचा मोबदला म्हणुन तक्रारदार यांच्याकडे ५०० रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३०० रुपये स्विकारले असता आलोसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडण्यात आले असून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments