सोलापूर! वळसंग पोलिसांकडून तब्बल दोन वर्षांनी आरोपीला अटक


दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे तब्बल दोन वर्षे चार महिने चोरी करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या म मार्गदर्शनाखाली वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यासह श्रीनिवास दासरी, गणेश पाटील, सत्यवान बनकर यांनी सहभाग नोंदविला.

दि. १७ जानेवारी २०२० रोजी दाखल झालेल्या चोरी व दरोडा गुन्ह्यातील फरार आरोपी आदित्य माणिक गायकवाड (वय २४, सेटलमेंट कॉलनी) यास तब्बल दोन वर्षे चार महिन्यानंतर अटक केली. फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे वळसंग पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्ह्यातील फरार आरोपी आदित्य माणिक गायकवाड हा सोलापूर शहर हद्दीत आल्याची गोपनीय बातमी मिळताच सापळा रचून पथकाने अटक केली. सदर आरोपीस कोर्टाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments