गोंदिया/प्रतिनिधी:
गोंदिया जिल्ह्यातील एका एका तलाठ्याने ८०० रुपयांसाठी आपल्या नोकरीवर गदा आणली आहे. शेत जमिनीचा सातबारा दुरुस्त करण्यासाठी लाच मागणाऱ्या या तलाठ्याला गोंदिया एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. मनोज कोहपरे असे आरोपी तलाठ्याने नाव आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील शेतकऱ्याला शेतजमीन विकायची होती. त्यासाठी या शेतकरी सातबारा काढण्यासाठी पानगाव तलाठी कार्यालयात गेला. मात्र सातबाऱ्यामध्ये जमीन ओलित नसल्याचे नमूद नसल्यामुळे ०.३२ हे. आर. जमिनीची रजिस्ट्री होऊ शकत नाही असे अर्जनविस यांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदार शेतकरी पुन्हा सातबाऱ्यावर ओलित शेतजमीन असा उल्लेख करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला.
दरम्यान सातबाऱ्यावर ओलित लिहायचे असेल तर १००० रुपये द्यावे लागतील. असं तलाठी मनोज कोहपरे यांनी शेतकऱ्याला सांगितलं. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचत आरोपी मनोज कोहपरे याला तडजोडी नंतर ८०० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या संपूर्ण प्रकारानंतर लाचलुचपत पथकाने संबधित तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments