बार्शी! कारखान्याच्या उचलीचे पैसे दिले नाहीत म्हणून एकाचे अपहरण; तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

कारखान्याच्या उचलूचे पैसे दिले नाहीत म्हणून नागोबाची वाडी येथील चाळीस वर्षीय इसमाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरण कर्त्याची पत्नी कल्याणी उर्फ सारीका तानाजी येळे, वय: ३३ वर्षे, रा. नागोबाचीवाडी, ता. बार्शी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, २१ मे रोजी दुपारी ४.१५ वा. चे सुमारास बाळराजे चौक, जामगाव (आ), ता. बार्शी येथुन उमेश ढेरे, बिरु ढेरे व योगेश ढेरे, सर्व रा. भोपले, ता. मोहोळ यांनी माझे पती तानाजी जालींदर येळे, वय: ४० वर्षे यांचे अपहरण करुन त्यांना अज्ञात स्थळी अटकावुन ठेवले आहे. म्हणुन उमेश ढेरे, बिरु ढेरे व योगेश ढेरे, सर्व रा. भोपले, ता. मोहोळ त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मध्ये अपहरण कर्त्याला कारखाण्याचे पैसे द्यायला सांगा. त्याने पैसे दिले नाहीत तर त्याला सोडणार नाही, त्यावर फिर्यादीच्या सासर्यांनी आमचेकडे पैसे आले की, लगेच कारखाण्याचे पैसे देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ३ जणांविरुद्ध भादवि कलम ३४,३६३,३६५ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments