२१ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण व सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने MIDC चिंचोळी येथील उद्योग भवनामध्ये नोकरी मेळावा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. सदर मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, सचिव वासुदेव बंग, उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी दीपप्रज्वलन केले.
या नोकरी मेळाव्या मध्ये सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन परिवर्तन गट अंतर्गत येणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षणानुसार नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर नोकरी मेळाव्यामध्ये MIDC सोलापूर येथील जवळपास ११ कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली होती. सदर नोकरी मेळाव्यात जवळपास १०० युवक युवतींनी मुलाखत दिली. मुलाखत दिलेल्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलेले असून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये त्यांना प्रत्यक्ष कंपन्यांमधे बोलावून त्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमास सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राम रेड्डी यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारे प्रभारी पोलीस उपअधीक्षक जोतिराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, राखीव पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर व पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दुधगी यांनी केले तर प्रास्ताविक उपाध्यक्ष गणेश सूत्रावे यांनी केले. सदर कार्यक्रमास सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे सहसचिव रामेश्वरी गायकवाड, कार्यकारी सदस्य तारासिंग राठोड, शिवशंकर आंधळकर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव वासुदेव बंग यांनी केले.
0 Comments