सोलापूर! आय पी एस सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर आयुक्तालयाचा अतिरिक्त कार्यभार



सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे विद्यमान पोलीस आयुक्त हरिश बैजल अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सोलापूर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे देण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त निवृत्त होण्यापूर्वीच नवीन कोण अधिकारी येणार याची सर्वत्र चर्चा होती. सोमवारी अचानक आयपीएस सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

 सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्याकडून पदभार घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाची सुत्रे सुधीर हिरेमठ हाती घेणार आहेत. 

Post a Comment

0 Comments